माजी आ. हरीभाऊ जावळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी

0

फैजपूर : भाजपाचे माजी खासदार व माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना एका इसमाने फोनवरून संदेश पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. राजेंद्र आर.पवार (व्यंकटेश नगर, हरीविठ्ठल रोड, जळगाव) असे या इसमाचे नाव त्याने मी तुमचा 33 दिवसानंतर खून करेल, असा पाठवलेल्या संदेशात नमूद आहे. या दिलेल्या धमकीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी माजी आमदार जावळे यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दिली असून जिल्हा पोलिस अधीक्षकांशीही चर्चा केली आहे.

यापूर्वीदेखील अनेक राजकीय लोकप्रतिनिधींना राजेंद्र पवार नामक व्यक्तीच्या मोबाईलवरून संदेश पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने या इसमाचा शोध घेवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. खिर्डी येथील तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील यांनादेखील जळगाव येथील राजेंद्र आर.पवार (व्यंकटेश नगर, जळगाव) या नावाने संदेश पाठवत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती.

पोलिसांनी कठोर कारवाई करावी : हरीभाऊ जावळे

गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात आपले कुणाशीही वैमनस्य नाही त्यामुळे अशा पद्धत्तीने मोबाईलवर धमकी आल्याने फैजपूर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कानावरही हा प्रका टाकण्यात आला आहे. जो कुणी हा धमकी देणारा इसम असेल त्याचा पोलिसांनी शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाईची करण्याची गरज असून आपला पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्‍वास असल्याचे माजी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.